रावेरच्या पोलीस स्थानकात जातीय सलोख्याचा आदर्श

रावेर प्रतिनिधी । येथील पोलीस स्थानकात यंदा स्थापन केलेल्या तुरटीच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे मुस्लीम महिला कर्मचार्‍याने दररोज आरती करून जातीय सलोख्याचा नवीन आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.

रावेर पोलीस स्टेशन येथे अर्धा फुट उंची असणारा तुरटीचा गणपती स्थापन करण्यात आला होता. दररोज सकाळी व संध्याकाळ रावेर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेली महिला पोलीस रईसा इस्माईल तडवी ह्यांनी दररोज पूजा व स्वतः आरती करीत होत्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण म्हणून याचे कौतुक करण्यात आले.

दरम्यान, शेवटच्या दिवशी आरती करून तुरटीच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content