रावेर प्रतिनिधी | येथील एका टेंट हाऊनमधून विद्युत पंपाची चोरी करण्याच्या आरोपातून शहरातील एका अल्पवयीन आरोपीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, लक्ष्मीकांत एकनाथ जव्हरे यांच्या मालकीचे टेंट हाऊस असून याचे आठवडे बाजारातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दुकान आहे. या दुकानाच्या पोर्चमधून पंधरा हजार रूपये मूल्य असणारा व साडे सात हॉर्स पॉवर इतकी क्षमता असणारा विद्युत पंप चोरीस गेल्याचे त्यांना आढळून आले. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता शहरातील एका अल्पवयीन मुलाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने चोरी केलेला विद्युत पंप काढून दिला. या प्रकरणी लक्ष्मीकांत एकनाथ जव्हरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलीस स्थानकात पो.स्टे.भाग-५गुरनं./सीसीटिएनएस २५०/२०२१भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही चोरी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक मनोहर जाधव, एएसआय इस्माईल शेख, पोना महेंद्र सुरवाडे, महेश मोगरे, सुरेश मेढे, सचिन घुगे, प्रमोद पाटील, प्रदीप सपकाळे, योगेश चौधरी,यांनी उघडकीस आणली आहे.