Home क्राईम धक्कादायक : शेतातील झोक्यातून दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण

धक्कादायक : शेतातील झोक्यातून दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण

0
144

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील देवगांव शिवारातील एका शेतातील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यात झोपलेल्या एका दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धुळे तिल्ह्यातील शिरपूर येथील आदीवासी दाम्पत्य हे जळगाव तालुक्यातील देवगाव येथील शिवारात वास्तव्याला आहे. शेतमजूरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दाम्पत्याने शेतात काम करत असतांना त्यांची दोन वर्षाची मुलगी हीला लिंबाच्या झाडाला झोका बांधुन झोपविले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने झोक्यात झोपलेल्या चिमुकलीचे अपहरण केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दाम्पत्याने सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound