हार्ट ऑफ गोल्ड : अँब्युलन्स नादुरूस्त झाली तरी स्वर्गरथातून रूग्णांना उपचारासाठी नेणारा देवदूत !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत चोपडा येथील अँबुलन्स चालक सागर बडगुजर यांनी अविरतपणे रूग्णसेवा केली असून वेळ प्रसंगी ते पीपीई किट घालून अंत्यसंस्कार देखील करत असतात. त्यांच्या कार्याला रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून सन्मान केला आहे.

अँब्युलन्स नादुरुस्त तरी रुग्णांची सेवा करायची म्हणून स्वर्गरथ मधून लोकांना वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणारा देवदूत.

श्री. सागर बडगुजर
सर्पमित्र व अँब्युलन्स चालक, चोपडा

सलाम त्यांच्या सेवाभावनेला !

एक साधारण अँब्युलन्स चालक, रुग्णांना तत्परतेने मोठ्या हॉस्पिटलमध्ये ने – आण करणारा. कोरोना काळात जेव्हा माणूस आजारी पडतो, तेव्हा स्वतःहून मदत करणारे खुप कमी लोक भेटतात. अशा काळात माणुसकीच्या नात्याने रुग्णाच्या घरी जाऊन त्याला स्वतः सोबत घेऊन सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्याचे काम सागर बडगुजर अविरतपणे करत आहेत.

जेव्हा कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाच्या अंतिम संस्कारासाठी नातेवाईक ही नसतात किंवा समोर येत नाहीत,अश्या वेळी स्वतः पीपीई किट घालून अंतिम संस्कार ही करतात. रुग्णांना रुग्णालयात नेतांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये कोणीही नसते तेव्हा वेळोवेळी गाडी थांबवून स्वतः तब्येत तपासतात त्याला धीर देतात, आणि हॉस्पिटल मध्ये सोडतात.

कोरोना काळात समाजातून वर्गणी गोळा करून वर्गणी न मिळाल्यास घरून बनवून रस्त्याने घरी जाणार्‍या लोकांना जेवणाचे वाटप केले. रुग्णांची ने – आण करतांना स्वतः ५-६ वेळा आजारी पडले तरीही काम अविरत सुरूच…

श्री सागर बडगुजर व आपल्या कामाला धर्म समजणार्‍या सर्व अँबुलन्स चालकांना आमचा सलाम!

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Protected Content