छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत मोरे

जळगाव, प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली . जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नियुक्तीपत्रांन्वये ही नियुक्ती केली .

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , महानगराध्यक्ष भैय्या पाटील , महानगर सरचिटणीस राहुल नेवे, मुकुल सोनवणे, आबू सुफीयन बागवान , भैय्या सोनवणे , रोहन देशमुख , सोनु परदेशी व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

सदर नियुक्ती बद्दल संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील , लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे , राहुल सोनवणे , मुकुंद सपकाळे , विनोद देशमुख, सचिन धांडे , अजय गांधी , ऍड. बिपिन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content