पानटपरी धारक तरूणानं उचललं टोकाचं पाऊलं ..

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोपाळपुरा येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शशिकांत देविदास पाटील (वय-३२, रा. गोपाळपुरा, जुने जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, शशिकांत पाटील हा आपल्या आई व भाऊ यांच्यासोबत जुने जळगावातील गोपाळपुरा येथे वास्तव्याला होता. नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉप जवळ पान टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तो त्याच्या मित्रांना एसटी वर्कशॉपजवळ भेटला होता. त्यानंतर तो घरी गेला. कुठल्यातरी कारणाने त्याने छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी १ वाजता कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान, नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. शनिपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शशिकांत पाटील याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content