डीएनसी महाविद्यालयजवळून डंपरची चोरी; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डीएनसी महाविद्यालय परिसरात पार्क करून लावलेला डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, किरण अरविंद पाटील वय-२८ रा. डीएनसी महाविद्यालय, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बिल्डींग मेटरीयल सप्लाय करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीचा डपंर क्रमांक (एमएच १९ सीवाय ६६७१) हा महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेवर रविवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता पार्कींग करून लावलेला होता.मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हा डंपर चोरून नेल्याचे सोमवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. त्यांनी डंपरचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी ४ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे.

Protected Content