बंडखोरांचे मन वळविण्यासाठी रश्मी ठाकरे यांचा पुढाकार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. एकीकडे शिवसेनेकडून बंडखोरानां कारवाईचा इशारा देण्यात येत असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेत बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

गेल्या आठवडाभरापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४१ आमदारांना गुवाहटी येथे नेवून भाजपा सोबत युती करून सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर संकट ओढावले आहे. बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय संकट गडद होत चालले आहे. त्याचचेळी उध्दव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबियांची चिंता वाढत आहे.  आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत. त्याचवेळी, उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत.

Protected Content