घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत केवळ पाच जणांना परवानगी

नवी दिल्ली । निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी असेल.

निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीसाठी होणाऱ्या घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी असेल. तसेच केंद्रीय गृहमंत्रालाने दिलेल्या सूचनांनुसारच सभा आणि रोड शोंना परवानगी देण्यात येईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून स्पष्ट केले की, यावेळी उमेदवार सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करू शकतील. देशातील निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच कुठलाही उमेदवार हा सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करतील. त्याशिवाय, विधानसभेच्या उमेदवारांचे नामांकनही ऑनलाइन भरता येईल.

तसेच कोरोना संकट विचारात घेऊन सावधगिरी बाळगण्याची सूचना निवडणुक आयोगाने केली आहे. निवडणूक काळात फेस मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ग्लव्हज, पीपीई किट्सचा वापर निवडणूक प्रक्रियेदरम्यान केला जाईल. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालक करण्यात येईल
.
कोरोनाची भीती विचारात घेऊन व्होटर रजिस्टर असाइन करण्यासाठी सर्व मतदारांना ग्लव्स देण्यात येतील. मतदारांना ईव्हीएम मशीनमध्ये मतदान करण्यापूर्वी गरज पडल्यावर ओळख पटवण्यासाठी फेसमास्क हटवावा लागेल.

Protected Content