अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विद्यूत पोलचे नुकसान

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा रस्त्यावर असलेल्या विद्यूत पोलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चार ते पाच विद्यूत पोलचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरातील विद्यूत प्रवाह खंडीत झाला होता.

 

शहरातील पारोळा रोड लगत भवानी बाग पासुन पुढे वळणावर असलेल्या विज वितरण कंपनीच्या विद्युत पोलला शुक्रवार रात्री ११ ते ११-३० च्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विज कंपनीच्या तीन पोल जमिनदोस्त झाले आहे. तर दोन पोल वाकले आहे. यामुळे विद्युत तारा जमिनीवर विखुरल्या तर काही ठीकाणी विद्युत तारा लोबकळत होत्या. यामुळे रात्री जवळपास तीन तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. यात धडक दिलेले पोल हे वडधे ते पेठ फीटर ची मेनलाईनचे असुन यापोलवर ११ केव्हीचा विद्युत पुरवठा सुरु होता. तर अन्य पोलवर एलटी लाईन २३० होल्टचा लोड होता. अज्ञात वाहनाने विज कंपनीच्या पोल धडक दिली त्यावेळी पीएसआय डीपी वरुन सप्लाय सुरु होता. त्या दरम्यान त्या भागातुन मानवी वापर न झाल्या मुळे मनुष्य हानी झाली नाही. अन्यथा मोठी मनुष्य हानी झाली असती. यापुर्वी देखिल या परीसरात वाहनानी रात्री अपरात्री धडक दिल्याने विद्युत पोलचे नुकसान झाले होते. विद्युत पोलला धडक देणारे अज्ञात वाहन वाळु वाहतुक करणारे डंपर होते असे बोलले जात आहे. मात्र विज वितरण कंपनी कडुन अद्यापही अज्ञात वाहन व चालक विरुध्द उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

 

दरम्यान अर्बन २ चे शाखा अभियंता एस. एस. दहीवले यांनी या ठीकाणी तात्काळ भेट देवुन वायरमन भुषण पाटील, नितीन खैरनार, रविद्र महाजन, भुषण वाघ यांच्या सहकार्याने पोल उभे करण्याचे काम सुरु केले. सायंकाळी उशिरापर्यत युध्द पातळीवर सर्व कर्मचारीच्या माध्यमातून पोल उभे करुन विद्युत पुरवठा सुरळीत केला होता.

Protected Content