सुटीच्या दिवशीही काम करत शिक्षण विभागाकडून डिसले गुरुजींना १५३ दिवसांची रजा मंजूर

मुंबई वृत्तसंस्था | रणजितसिंह डिसले यांना ‘ग्लोबल टीचर’ हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही स्कॉलरशीपसाठी परदेशात जाण्याकरता बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र सुटीच्या दिवशीही रविवारी काम करत शिक्षण विभागाकडून डिसले गुरुजींना १५३ दिवसांची अध्ययन रजा मंजूर करण्यात आली आहे.

‘Fullright Foreign Scholarship Board’ या अमेरिकन सरकारच्या स्कॉलरशीपसाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. रजेसंदर्भात त्यांना परदेशात जाण्याकरता बऱ्याच अडचणी येत होत्या. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डिसले यांना स्कॉलरशीपसाठी परदेशात पाठवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी आज रविवार, दि २३ जानेवारी रोजी काम करत शिक्षण विभागाकडून डिसले गुरुजींना १५३ दिवसांची अध्ययन रजा मंजूर करण्यात आली आहे. दि. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत त्यांना रजा मिळाल्यामुळे डिसले गुरुजींना आता स्कॉलरशिपसाठी परदेशात जाता येणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!