तरूणीच्या घरात शिरून बलात्कार; पाच आरोपींवर गुन्हा दाखल

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे शहरातील कात्रज परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील तरुणीच्या घरी जबरदस्तीने शिरुन तिच्यावर घराजवळ राहणाऱ्या तरुणाने बळजबरीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच आरोपीवर पोलिस ठाण्यात बलात्कार, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणीने आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी पी. अभि नितीन खेडेकर त्याची आई, बहीण व मामा आणि मित्र यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभि खेडेकर हे महिलेच्या घरासमोर आले होते. त्यांनी किरकोळ वादातून महिलेस शिवीगाळ केली. अभि खेडेकर हा महिलेच्या घरात जबरदस्तीने शिरला व त्याने तरुणीस अश्लील शिवीगाळ करुन तिच्यावर बळजबरी करुन शारिरिक संबंध केले. तर आरोपीची आई, बहीण व मामा यांनी देखील महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत तिला हाताने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या डोळयाला, डोक्याला व बरगडीस गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, याबाबत पाच आरोपीवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content