पाचोरा येथे निरज चोप्रा यांची साकारली रांगोळी

पाचोरा प्रतिनिधी । येथील शितल आर्टच्या प्रशिक्षिका शितल पाटील यांनी सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा यांची हुबेहुब रांगोळी साकारली आहे. 

भारतीय इतिहासात अनेक शूर सेनानी आणि पराक्रमी व्यक्तीची प्रेरणा आपणाला जीवनाच्या अनेक संकटांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य देत. त्यांच्या विचारांची प्रेरणा देखील मनोमन यशाला गवसणी घालण्याची उमेद मनात निर्माण करतात. आताच ओलंपिक मध्ये हा अनुभव पाहायला मिळाला पुरोगामी ऐतिहासिक महान शूर वीर आणि संस्कार तृप्त अशा अनेक वीरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अहोरात्र मेहनत करून भारताची मान उंच करणाऱ्या नीरज चोप्रा यांना शीतलआर्ट क्लासेसच्या प्रशिक्षिका शीतल पाटील व योगिता पाटील यांच्या  कलेतून सलाम करत शूर विराच्या विचारातून मिळालेली प्रेरणा नक्कीच या सुवर्ण पदकाची महत्वकांक्षी भावना मांडत असेल पण या भावनेतून नीरज चोप्रा यांनी मांडलेली प्रेरणा ही नक्कीच प्रत्येकासाठी मोलाची ठरेल यात शंका नाही. असे मनोगत शितल आर्टच्या प्रशिक्षिका शितल पाटील यांनी व्यक्त केले.

 

Protected Content