Home Cities जळगाव जळगावात झाल्टे गृपतर्फे गरजूंना ब्लँकेटचे वाटप

जळगावात झाल्टे गृपतर्फे गरजूंना ब्लँकेटचे वाटप


जळगाव प्रतिनिधी । शहरातील झाल्टे गृपचे सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा कार्यालय समोरील पत्र्या हनुमान मंदिरासाह शहरात विविध ठिकाणी गोरगरिब गरजूंना ब्लँकेटचे वाटप, फळ वाटप आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले.

याप्रसंगी राजीव गांधी निराधार योजनेचे तहसिलदार अनिल पठाडे, लोकजनशक्ती पार्टीचे महानगराध्यक्ष इरफान शेख, शिक्षक श्री. चौधरी सर, पत्रकार अमीन तडवी, इमरान खान, शिरसाठ वैशाली अहिरे, राहुल अहिरे, अभय साळुंके, डी.आर गोसावी, विक्रम शिरसाठ उपस्थित होते. तसेच हा उपक्रम दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे हे राबवित असून अ‍ॅड. राजेश झाल्टे यांच्या सुचनेनुसार श्री. अहिरे हे विविध उपक्रमात सहभागी असून सर्वसामान्य व्यक्तींची जाण असल्याने सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.


Protected Content

Play sound