खान्देशात कानबाई मातेची मोठ्या हर्षोलासात स्थापना

 

WhatsApp Image 2019 08 11 at 7.35.01 PM

जळगाव, प्रतिनिधी | खान्देशातलं जळगाव, धूळे, नंदुरबार येथे सर्वात प्रसिद्ध ग्रामदैवत असा कानबाई माता आहे. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यानुसार आज कानबाई मातेची स्थापना करण्यात आली.

पंधरा दिवस आधीपासूनच कानबाई मातेच्या उत्सवाच्या   तयारीस  सुरुवात होते. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो. त्यावरची अशी आकर्षक रोषणाई सा-यांचंच लक्ष वेधून घेते. कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिलं जातं त्याला अलंकारानं मढवलं जाते १०७ प्रकारच्या वनस्पती आणि ७ नद्यांचं पाणी आणून कानबाईची पूजा केली जाते. आज खान्देशात कानुबाइ मातेची उत्साहात स्थापना झाली. आज स्थापना होऊन गोड नैवद्य दाखवला जातो. रात्री कानबाई मातेची स्थापना करून रात्रभर कुटुंबातील सदस्य अहिराणी भाषेतील लोकगीतांवर नृत्य करतात. ‘रोट’चा प्रसाद या उत्सवासाठी खास तयार केला जातो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ग्रहण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी वाद्यांच्या तालावर कानबाईची विसर्जन मिरवणूक काढतात. यावेळी सर्व भाऊ बंदकि उपस्थित असते
. याप्रसंगी भाउबंदकित काही वाद भांड़ने यामुळे दुरावा झाला असेल तर तो या निमित्ताने संपुष्टात येतो.

Protected Content