पहूर येथील रंगमच बनला गुरांचा गोठा; आजपर्यंत एकही सांस्कृतिक कार्यक्रम झाला नाही

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे प्रभाग क्रमांक ३ मध्ये समर्थ विठ्ठल मंदिराच्या मागे व कथीत जय सप्तशृंगी मॉ निवासीनी ट्रस्टच्या जवळ उभारण्यात आलेल्या रंगमंचावर आजपर्यंत पहूर गावाच्या इतिहासात एकही सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही. केवळ गुरे बांधण्यासाठीच त्याचा उपयोग होत असल्याने ‘ गोठा की रंगमंच ? असा प्रश्ना उपस्थित होत असून शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या या रंगमंचने नेमके कोणाच्या जीवनात रंग भरले ? असा खडा सवाल संतप्त गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की , पहूर – कसबे ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नं . ३ मध्ये रंगमंच उभारण्यात आलेला आहे . या रंगमंचावर एकही सांस्कृतिक तथा धार्मिक कार्यक्रम झालेला नाही. केवळ गाई – गुरे बांधण्यासाठीच या रंगमंचाचा उपयोग होत आहे. ६ वर्षांपूर्वी ३० जून २०१८ च्या ग्रामपंचायत सभेनुसार १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ३ लाख रुपये रंगमंचाच्या दुरुस्ती साठी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत एकही कार्यक्रम येथे झालेला नसल्याने या रंगमंचाची गरजच नव्हती तर बांधला कशासाठी ? केवळ शासकीय निधी खर्च करण्यासाठीच योजना राबविली काय ? कार्यक्रमच झाला नाही तर लाखो रुपये खर्च कशासाठी केले ? देखभाल दुरुस्तीवर खरोखरच खर्च केले का ? या रंगमंचाने नेमके कोणाच्या जीवनात रंग भरले ? असे एक ना अनेक प्रश्न संतप्त पहूर वासीय नागरीक विचारत आहेत . या प्रकरणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी , पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी नागरीकांसह मधून होत आहे .

Protected Content