व्यापार्‍यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | व्यापार्‍यांच्या दोन गटांमध्ये व्यवहारावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना येथे घडली.

जामनेर व भुसावळ येथील दोन कापूस व्यापार्‍यांमध्ये जुन्या बोदवड रोडसह भुसावळ रोडवर पोलिस ठाण्यासमोर वाद झाले. यता दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी पोलिस ठाण्यापासून नगरपालिका चौकापर्यंत हाणामारी करणार्‍यांसह समर्थकांवर लाठीमार करून जमाव पांगवला.

दरम्यान, हा गोंधळ पाहून सराफ बाजारातील व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद केली होती. या प्रकरणी पोलिसांनी वादातील प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरा याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होता. तर, शहरात शांतताच आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शहराची शांतता भंग करणार्‍यांवर पोलिस प्रशासन सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिला आहेे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: