राणा दाम्पत्य – खासदार भायखळा, तर आमदार तळोजा तुरुंगात

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीसांनी आज धार्मिक भावना भडकावल्याचा आरोपाखाली अटकेत असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर, नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात येऊ शकतं. अशी माहिती समोर आली आहे.

भारतीय दंड संहिता 124 अ अंतर्गत राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे.

त्यांची तुरुंगाच्या दिशेने रवानगी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर, नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात येऊ शकतं.

Protected Content