यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चोपडा, यावल आणि रावेर परिसरात गुटखा माफियांवर कारवाई होत असताना ही यावल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या इतर राज्यातून तस्करीतून आयात करून विक्रीस येणाऱ्या मौखिक आरोग्याच्या समस्या व विविध गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल पानमसाला गुटख्याची सर्रासपणे यावल शहरातील बसस्थानक परिसर, शाळा विद्यालय अशा सार्वजनिक परिसरात उघडपणे पान टपऱ्यापासून तर किराणा दुकानातून लाखो रुपयांच्या पानमसाला गुटख्याची विक्री करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यास निगडीत विषयाकडे संबधीत अन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने पालक व सुज्ञ नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गुटखा विक्रीवर कारवाई कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.
यावल, चोपडा आणि रावेर हे तिन्ही तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असुन सीमा रेषेवर गुजरात आणि मध्यप्रदेश अशी दोन राज्य तालुक्यास लागून असल्याने या दोन्ही राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या विमल गुटख्याची छुप्या पद्धतीने यावल तालुक्यातील गुटखा माफियांकडून खाजगी वाहन व एसटीव्दारे चोरट्या मार्गाने आयात केली जात आहे. नंतर एका गोदामात या गुटख्याची साठवणूक करून तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटख्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे.
या गुटख्याची एका महिन्यास सुमारे ५० ते ६० लाखाची विक्री करण्यात येत आहे. या बाबतची माहिती संबधीत अन्न व प्रशासन विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. जिल्ह्यात मुक्ताईनगर, भुसावळ, चोपडा, रावेर व यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रातील फैजपुर परिसरात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला जात आहे. मात्र यावल तालुक्यात प्रशासनाकडून या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे .