पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुस्लिम समाजामध्ये पवित्र मानली जाणारी रमजान ईद पाचोरा शहरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. महिनाभर कडक उपवास ठेवत रोजा पाळल्यानंतर ३१ मार्च रोजी मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी आनंदाने एकमेकांची गळाभेट घेतली आणि शुभेच्छा देवाणघेवाण केली.
शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करण्यात आले, त्यानंतर मुस्लिम बांधवांनी आप्तेष्ट आणि मित्रपरिवारासोबत ईदच्या आनंदात सहभागी होत सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण केले. जारगाव ग्रामपंचायतीचे सदस्य हमीद शहा, कादर खान, रिजवान शिकलकर, मुस्तफा खान, आदील खान, आलम खान यांनी एकत्र येत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात सर्वत्र चैतन्यपूर्ण वातावरण होते, आणि रमजान ईदने पाचोऱ्यात सद्भावनेचा संदेश दिला.