रावेर येथे पुरोहित संघातर्फे महारूद्राभिषेक

WhatsApp Image 2019 06 22 at 4.32.28 PM

रावेर (प्रतिनिधी) वरूण राजाने बरसुन दुष्काळ दूर व्हावा यासाठी आज सकाळी पुरोहित संघातर्फे ब्रह्मीभूत सदगुरु श्री रामस्वामी महाराज यांचे समाधिवर महा रूद्राभिषेक करून जलाभिषेक करण्यात आला.

येथील रामस्वामी मठात पुरोहित संघाचे अध्यक्ष कपील महाराज यांचे हस्ते विधिवत पूजन करून अभिषेक करण्यात आला. यावेळी पुरोहितांनी मंत्रोच्चारात पूजन ,अभिषेक व महाआरती करण्यात आली. उपस्थितांमध्ये समस्त ब्रह्मवृंदाचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, संजय लीमय ,अनिल मटकरी ,संजय मटकरी ,तसेच पुरोहित्य करणारे गोपाल दुबे, श्याम दुबे, प्रभुदत्त मिसर, गणेश दुबे (केऱ्हाळे), यशवंत मिसर, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी , अभिजीत कुलकर्णी ,अनंत दुबे (केऱ्हाळे),अजय कुलकर्णी (सावदा), जयंत भागवत ( रावेर ) या वेळी उपस्थित होते.

Protected Content