Home Cities यावल यावल येथे रक्षाताई खडसे यांच्यासाठी महायुतीचा प्रचार

यावल येथे रक्षाताई खडसे यांच्यासाठी महायुतीचा प्रचार

0
45

यावल प्रतिनिधी । महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत.

लोकसभा निवडणुक प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असतांना आजपासुन भाजपा महायुतीच्या उमेदवार, श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेनेसंयुक्त प्रचारास सुरूवात केली आहे. आज सकाळ पासुन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उमेश फेगडे, हेमराज फेगडे, प्रमोद नेमाडे, व्यंकटेश बारी, वसंतराव भोसले, गोपाळ सिंग पाटील, किशोर कुलकर्णी भुषण फेगडे, यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे, जगदीश कवडीवाले, शिवसेने माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, पप्पू जोशी, संतोष खर्चे,भरत कोळी, शरद कोळी, रिपाईचे आठवले गटाचे भिमराव गजरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी यावल शहरातील विविध प्रभागात फिरून खासदार रक्षाताई खडसे यांच्यासाठी मते मागीतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound