नव्या ३६ मंत्र्यांचा  शपथविधी ३० डिसेंबरला विधान भवनाच्या प्रांगणात 

sena congress bjp

मुंबई (वृत्तसंस्था) येत्या ३० डिसेंबरला नव्या ३६ मंत्र्यांचा  शपथविधी विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. ३० डिसेंबरला होणाऱ्या या राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराला मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार तसंच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने राज भवन ऐवजी विधान भवनात शपथविधी होणार आहे.

 

 

महाविकासाघाडीच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १० आमदार कॅबिनेट कर ३ मंत्री राज्यमंत्रीपदाशी शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे ही १० आमदार कॅबिनेट आणि ३ आमदार राज्यमंत्रीपाची शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसचे ८ जण हे कॅबिनेट आणि २ जण राज्यमंत्रीपदाशी शपथ घेणार आहेत. यामुळे विधान भवनातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ३० डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरक्षेच्या कारणास्तव विधान भवनाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ९.५५ वाजण्यापूर्वी हजर राहावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या ३६ मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा राज भवनाऐवजी विधान भवनात पार पडणार आहे. अजून कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.

 

Protected Content