देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का न लावता गरीबांच्या खात्यात पैसे : राहुल गांधी

download 1

नागपूर (वृत्तसंस्था) कॉंग्रेस प्रत्यक्षात काम करते तर भाजपाला केवळ आश्वासनं देता येतात असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर केला. त्यांनी गरिबांच्या खात्यांवर  ७२ हजार रुपये कसे येतील याचे स्पष्टीकरण दिले. यांत त्यांनी काँग्रेसमधल्या काही अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्याचे सांगितले.  देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का न लावता गरीबांच्या खात्यात किती पैसे टाकता येतील असा प्रश्न त्यांना विचारला. पी. चिदंबरम यांनी ७२ हजारांचा आकडा दिला. त्यामुळेच त्यांनी ते आश्वासन दिले असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  संघाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात त्यांनी भाजपावर टीका केली. गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणं हेच आमचं लक्ष्य आहे असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, त्यांच वय जरा वाढलंय त्यामुळे त्यांना त्याची आवश्यकता वाटते. माझं तसं नाही, मला तुमच्यासोबत १५ ते २० वर्षे काम करायचे आहे. आम्हाला खोटं बोलून प्रगती करतो असे दाखवायचे नाही. महिना १२ हजार रुपये प्रति महिना उत्पन्नापेक्षा एकही व्यक्ती देशात नको हे आम्ही ठरवले आहे. भारताच्या २० टक्के सर्वात गरीब वर्गाच्या बँक खात्यात काँग्रेसकडून पैसे जमा होतील याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. १५ लाख जमा करण्याचं खोटं आश्वासन देणार नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजपाचे नेते म्हणतात हे पैसे कुठून येणार? तुम्ही अनिल अंबानींना जमीन दिली तेव्हा हा प्रश्न का विचारला नाही? अनिल अंबानींना राफेलमध्ये सहभागी करून घेतलं तेव्हा हा प्रश्न का आला नाही? पतंजलीला जागा दिल्या तेव्हा प्रश्न का विचारला गेला नाही? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांच्या खिशातला पैसा काढून व्यापाऱ्यांना वाटला. देशात ज्यांनी चोरी केली त्यांच्या खिशातून पैसे येतील. मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्या खिशातून पैसे काढून तुम्हाला देऊ. हे सरकार कर्जमाफीचा डंका वाजवतं, मात्र ते शक्य झालं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावामुळे. मात्र कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यात आले का? असा प्रश्न उपस्थित केला.

Add Comment

Protected Content