नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील आरोपी सहा जणांना मुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या सर्व सहा आरोपींना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सहा आरोपींवर अन्य कोणता गुन्हा नसल्यास त्यांची मुक्तता करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता होणार आहे. न्यायमूर्ती बी.आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची वागणूक समाधानकारक असल्याचे म्हणत त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याची परवानगी दिली आहे.
राजीव गांधी हत्याकांडात नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. पेरारिवलनची याआधीच सुटका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने १८मे रोजीच चांगल्या वर्तवणुक असल्याचं नमूद करत पेरारिवलनची सुटका केली आहे.