खेडी खुर्द॥ येथील तरूण दहा दिवसांपासून बेपत्ता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खुर्द बुद्रुक येथील २५ वर्षीय तरूण गेल्या दहा दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला आहे. याबाबत तालुका पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

गिरीश जयंत चौधरी (वय-२५) रा. खेडी खुर्द ता. जि.जळगाव असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गिरीश चौधरी हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो तर वडील शेती काम करतात. शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याची (एमएच १९ एएम ९०६६) क्रमांकाची दुचाकी घेवून बाहेर गेला. परंतू रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाईक व मित्रांनी त्यांचा शोध घेतला परंतू कुठेही आढळून आलेला नाही. याप्रकरणी गिरीशचे वडील जयंत चौधरी यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव धेवून माहिती दिली. याप्रकरणी तालुका पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र पाटील करीत आहे.

 

Protected Content