गुजराल पेट्रोल पंपजवळील जुगार अड्ड्यावर छापा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ टपरीच्या आडोश्याला सट्टा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास केली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) रा. सिंधी कॉलनी आणि जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) रा. धानोरा ता.जि. जळगाव असे ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ बंद पडलेल्या टपरीच्या आडोश्याला काही जण मटका नावाचा सट्टा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.ना. किरण धनगर, पोहेकॉ दिपक पाटील, प्रमोद लाडवंजारी हे आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले. दुपारी जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित आरोपी शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) रा. सिंधी कॉलनी आणि जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) रा. धानोरा ता.जि. जळगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून साडे सहा हजाराची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून दोघांवर सायंकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content