इच्छादेवी चौकात मटका खेळणारे दोघे एलसीबीच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । जळगाव प्रतिनिधी । शहरातील इच्छादेवी मंदीर समोरील खुबचंद साहित्या बिल्डिंगजवळ कल्याण मटका खेळणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दोघांवर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल तुकाराम तायडे (वय-२६) रा. जळगाव जामोद ह.मु. हरीविठ्ठल नगर आणि दिपक किसन बिऱ्हाडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर आसोदा ता.जि.जळगाव असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत.

सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील इच्छादेवी मंदीर चौकात असलेले खुबचंद साहित्या बिल्डींगाच्या आडोश्यात कल्याण मटका खेळ असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ निजामोद्दिन शेख, सुरज पाटील, पोकॉ. दिपककुमार शिंदे , पोकॉ हेमंद पाटील यांनी दुपारी १ वाजून ४० वाजता जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात स्वप्निल तुकाराम तायडे (वय-२६) रा. जळगाव जामोद ह.मु. हरीविठ्ठल नगर आणि दिपक किसन बिऱ्हाडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर आसोदा ता.जि.जळगाव यांना जागेवरच पकडले. दोघांची अंगझडती घेतली असता दोघांकडून ७ हजार ४३० रूपयांची रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. पो.कॉ. हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content