Home राजकीय राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड ; संगमनेरसह इतर सभांना उशीर

राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड ; संगमनेरसह इतर सभांना उशीर

0
146

rahul gandhi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना पुन्हा दिल्लीला परतावे लागले आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे राहुल गांधी यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. विमानातील बिघाडामुळे त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभा उशिराने सुरू होणार आहेत.

 

राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभा होणार होत्या. समस्तीपूर येथील सभेसाठी राहुल हे विमानानं जात होते. सकाळी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. विमानाच्या कॉकपीटमधील व्हिडिओ त्यांनी ट्विट करून तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. या उद्भवलेल्या समस्येमुळे संगमनेरसह बिहार आणि ओडिशातील सभा सुरू होण्यास विलंब होणार आहे, असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound