Home राजकीय भोकर नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शिवा निंगवले यांच्या कुटुंबाची आ. नंदकिशोर महाजन...

भोकर नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शिवा निंगवले यांच्या कुटुंबाची आ. नंदकिशोर महाजन यांनी घेतली भेट

0
23

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोरखेडा (ता. रावेर) येथील भोकर नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शिवा निंगवले यांच्या कुटुंबीयांची आमदार नंदकिशोर महाजन यांनी घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

शिवा निंगवले हा युवक भोकर नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. निंगवले कुटुंब अत्यंत गरीब व आदिवासी असल्याने या दुःखद घटनेची माहिती मिळताच आमदार महाजन यांनी बोरखेडा येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. आमदार आपल्या घरी आल्याचे पाहून कुटुंबीय भावनिक झाले.

यावेळी आ. महाजन यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. तसेच शासनाच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक व आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्याचे आश्वासन दिले. “या कठीण प्रसंगी शासन आणि प्रशासन आपल्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. कुटुंबाला सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,” असे आ. नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, नगरसेवक पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, नगरसेवक राजू ठेकेदार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, बाळा आमोदकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound