राहूल गांधी यांची लोकसभेत पुन्हा ‘एंट्री’ ! सदस्यत्व बहाल

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी हे पुन्हा लोकसभेत दिसणार असून आज त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

खासदार राहूल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टिपण्णीनंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी तातडीने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. यानंतर सुप्रीम कोर्टाने ४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे राहूल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला होता. यामुळे ते पुन्हा लोकसभेत दिसतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. आणि आता तसेच झाले आहे.

आज राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने एक ऑर्डर काढून राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केली आहे. या ऑर्डरमध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची २४ मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश आला आहे. कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असं या नोटिशीत म्हटलं आहे.

Protected Content