पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग उद्यापासून सुरु

pune marg

 

कोल्हापूर प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्पचा आज दि. 11 ऑगस्ट रोजी सहावा दिवस उजाडला असून अद्यापही वाहतूक सुरु झालेली नाही आहे. पाणी ओसरल्यानंतरच म्हणजेच उद्या, सोमवारपासून महामार्ग खुला करण्यात येणार आहे. आज दुपारी पहिला टँकर सोडल्याने लोकांमध्ये महामार्ग सुरू झाल्याचा संभ्रम परसला होता.

याबाबत माहिती अशी की, महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नसून, अत्यावश्यक सेवा बोटीतूनच पुरवण्यात येणार आहे. केवळ इंधनाचे टँकर आणि अॅम्बुलन्सनाच महामार्गावरून वाट करून दिली जाणार आहे. महामार्गावर अद्याप पाणी असून ते ओसरल्यानंतरच म्हणजेच उद्या, सोमवारपासून महामार्ग खुला करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. रस्त्यावरून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. काल रात्रीपासून काल सकाळ दहापर्यंत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फुटाने कमी झाली असून, तरी अद्याप तीन ते साडे तीन फूट पाणी महामार्गावर आहे. तसेच पाण्याचा वेगही मोठा आहे.
महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी पाण्याचा टँकर पोकलेनसह पाठवून घेतली. टँकर पाण्याचा रस्ता पार करून गेला; मात्र पाण्याला वेग वाहतूक सुरक्षीत नसल्याचे जाणवले. त्यामुळे महामार्गावरून अवजड वाहतूकही होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरात जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा आपत्कालीनच्या बोट मधूनच केला जाणार आहे.

Protected Content