कोरेगाव-भीमा प्रकरण: केंद्र सरकारला काही गोष्टी लपवायच्या असल्यामुळे एनआयएकडे तपास : पवार

4Sharad 20Pawar 201 3

जळगाव (वृत्तसंस्था) भीमा कोरेगाव प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे देणे, म्हणजे त्यांना काही गोष्टी झाकायच्या किंवा लपवायच्या आहेत. सत्य बाहेर येण्याची भीती इथल्या तत्कालीन सरकारला असावी, म्हणून दिल्लीच्या सरकारने मदतीला येत सर्व प्रकरण काढून घेतले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

 

 

आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, कोरेगाव-भीमा प्रकरण घडलं त्यावेळी फडणवीस सरकार होते. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखे असेल, म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला, अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली. तर परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावून ज्यांचा संबंध नाही, त्या लोकांना केवळ लिखाण केले म्हणून आत टाकणे, त्यांच्यावर खटले भरणे, वर्षवर्ष त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हा दाखल करणे योग्य नाही, त्यासंबंधी चौकशी झाली पाहिजे’ अशी मागणीही शरद पवारांनी केली. कायद्यामध्ये केंद्र सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे, हे मान्य आहे. मात्र राज्याची संमती घेण्याची पद्धत आहे. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असेही पवार म्हणाले.

Protected Content