जळगावात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरासमोरून दुचाकी लंपास

 

two wheeler theft

जळगाव प्रतिनिधी । घरासामोर लावलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप भागवत भोई (वय-36) रा. शिवाजी नगर हे खासगी कंपनीत कामला आहे. त्यांची नेहमीप्रमाणे 17 सप्टेंबर 2019 रोजी रात्री कामावरून आल्यानंतर रात्री 10 वाजता दुचाकी लावली होती. सकाळी 5 वाजता दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी आज शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content