ऊसाला हमी भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यावर धडक

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शेतकऱ्यांच्या ऊसाला हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील वसंतदादा साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न पोलीसांनी रोखला. यात कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की करण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील ऊसला हमी भाव दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर काटाबंद आंदोलनासाठी एकत्र आले आहेत . कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवले,त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा प्रकार देखील घडला आहे. या ठिकाणी राजू शेट्टीचे नेतृत्वाखाली आता काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे.

Protected Content