अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोड परिसरात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली होती. या हाणामारीत ६ जण जखमी झाले आहे. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात दोन्ही गटातील २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अमळनेर शहरातील स्टेशन रोड परिसरात परदेशी आणि सातपुते या दोन कुटुंबात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात लाठ्या काठ्या, लोखंडी सळई, गुप्ती, लोखंडी कोयता, फायटर आणि चाकूने वार करून एकमेकांना जखमी केले. या घटनेत एकुण ६ जण जखमी झाले. यात पहिल्या गटातील मोहन बाळाजी सातपुते वय ६३ रा. स्टेशन रोड, अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश मनोहर राजपूत, सुमित योगेश राजपूत, मुकेश रमेश राजपूत, राजेश रमेश राजपूत, लोकेश योगेश राजपूत सर्व रा. स्टेशन रोड, अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसऱ्या गटातील योगेश मनोहर राजपूत वय ४७ रा. स्टेशन रोड, अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयूर अनिल सातपुते, पंकज मोहन सातपुते, कल्पेश नरेंद्र सातपुते, भूषण हरी चौगुले, नितीन सत्यवान सातपुते, यश मोहन सातपुते, तेजस नरेंद्र सातपुते, नरेंद्र बालाजी सातपुते, मोहन बाळाजी सातपुते, दीपक हरी चौगुले, संदीप हरी चौगुले, बाळा हरी चौगुले, अमोल सत्यवान सातपुते, मोहन बाळाजी सातपुते, नम्रता मोहन सातपुते सर्व राहणार स्टेशन रोड अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे रविवारी १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० वाजता दाखल झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख हे करीत आहे.