चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला त्वरीत अटक करा; रा.कॉ.शरद पवार गटाची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी हा फरार असून त्याला त्वरीत अटक करून त्याच्यावर जलद न्यायालयात खटला चालवून कडक शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ जून रोजी संशयित आरोपी सुभाष भील या नराधमाने जानेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ६ वर्षीय आदिवासी चिमुकलीला शेतात नेऊन अत्याचार करून तिख खून करून फरार झालेला आहे. ही घटना घडल्यापासून नराधम सुभाष भील हा फरार झाला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील काळात भडगाव येथेही अशी घटना घडली असता त्यातील आरोपी सापडला परंतु त्याला अजून पर्यंत ही शिक्षा झालेली नाही.

महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असून खून, दरोडे, अत्याचार अशा घटना वाढल्या असून राज्यातील गृह खाते व पोलीस विभाग अपयशी ठरले आहे. या घडलेल्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे निषेध करीत असून आरोपींना त्वरित अटक करावी व जलद न्यायालयात सदर खटला चालवून आरोपीला कडक शिक्षा करावी तसेच सदर घटनेत मृत पावलेल्या मुलीच्या पाल्यास पोस्को कायद्यांतर्गत व आदिवासी कायद्यानुसार जास्तीत जास्त मदत देण्याची शासनाकडून मिळवून देण्याची कृपा करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, आदिवासी विकास आघाडीचे इब्राहिम तडवी, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, समाजिक न्याय विभाग रमेश बहारे, महानगर जिल्हासरचिटणीस सुनील भैया माळी, महानगर जिल्हाउपंअघ्यक्ष किरण राजपूत, समाजिक न्याय कार्याध्यक्ष भाऊराव इंगळे, महानगर जिल्हासरचिटणीस रहीम तडवी, युवक महानगर जिल्हासरचिटणीस हितेश जावळे, युवक महानगर जिल्हाउपअध्यक्ष चेतन पवार, गोपाळ पचवणे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content