बहुभाषिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन : ६० रक्तदात्यांचा सहभाग

 

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरात बहुभाषिक संस्थेच्या माध्यमातून भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून  कै.बलदेव यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आकाशवाणी चौक हॉटेल मुरली मनोहर शेजारी आयोजित करण्यात आले  होते. शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

नियोजन बहुभाषिक संस्थेचे अध्यक्ष अशोक वाघ ह्यांच्या अध्यक्षतेखाली निरंजन कुलकर्णी, श्रीतेज पाठक, दिनकर जेऊरकर, सिद्धांत फडणीस, कमलाकर फडणीस, मोहन तिवारी, शिव शर्मा, किसन अबोटी, संग्राम जेऊरकर, केदार जोशी, पियुष रावळ, महेंद्र पुरोहित, श्रीकांत खटोड, विश्वनाथ जोशी, निलेश राव, पंकज पावणीकर, राजेश कुलकर्णी, संजय व्यास, गोपाळ पंडित, रदेश्याम व्यास, सुरेंद्र मिश्रा, आमला पाठक, सौरभ चौबे, अजित नांदेडकर, संजय कुलकर्णी (गोंडेगावकर) , राहुल कुलकर्णी ह्याच्या सहकार्यातून साकारण्यात आला.  त्यास रेडक्रोस सोसायटीच्या ब्लड डोनेशन व्हॅन चे सहकार्यातून करण्यात आला

प्रमुख उपस्थिती म्हणून आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन व आमदार राजू मामा भोळे, विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, ,रेड क्रॉस सोसायटीचे  डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी आदीं उपस्थित होते.

Protected Content