पुरूषोत्तम तायडे ठरला मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला लष्काराचा अग्निवीर !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने घोषीत केलेल्या अग्निवीर परिक्षेत मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक गावातील पुरूषोत्तम महादेव तायडे याने यश मिळविले असून तालुक्यातील पहिला अग्निवीर ठरला आहे.

पुरुषोत्तम तायडे यांची भारतीय लष्कराच्या अग्नीवीरपदी नियुक्ती झाल्याने मुक्ताईनगर तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पुरुषोत्तम हा ज्ञान पूर्ण विद्यालय इच्छापुर निमखेडी येथील शाळेचा विद्यार्थी असून गेल्या ३ वर्षांपासून अग्नीवीर म्हणून नियुक्ती होण्यासाठी अथक परिश्रम करत होता. शारीरिक कसरत कसं करत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविध विषयांचा अभ्यासही करत होता. औरंगाबाद येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रिया दरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी होऊन नुकतीच १३ ऑक्टोबर रोजी परीक्षा झालेली होती. त्यात तो उत्तीर्ण होऊन नियुक्ती झाल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला अग्नीवीर म्हणून त्याला बहुमान मिळालेला आहे.

Protected Content