यावल येथे पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यास तरूणांचा मोठा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील फैजपूर मार्गावर असलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास तरूणांनी मोठा प्रतिसाद दिला. यावल येथे संपन्न झालेल्या मोठया संख्येत बेरोजगार तरूणांनी विविध ११ कंपनीच्या व्यवस्थापिकीय मंडळास मुलाखती दिल्या. यातील काही गरजूंना जागेवरचं नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

शहरात फैजपूर रस्त्यावर जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी जळगाव जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. करण्यात आले होते. या मेळाव्या करीता जिल्ह्याभरातून तरूणांनी मोठी उपस्थिती दिली. मेळाव्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संध्या सोनवणे होत्या, तर मेळाव्याचे उद्घाटन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले, या मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक सुनील भोईटे, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, कौशल्या विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, श्रीकांत लांबोळे, आश्रय फाउंडेशनचे सचिव डॉ.पराग पाटील, कौशल्य विकास मंत्रालय मुंबईचे प्रतिनिधी दिनेश बारेला, अरुण ठाकरे, सुभाष कदम, महेश चौधरी, दिपक बोरसे, उपप्राचार्य प्रा.एम .डी. खैरणार, उपप्राचार्य अर्जुन पाटील, प्रा. सी.के.पाटील, प्रा.आर. एस. तडवी, प्रा.ए.जी.सोनवणे, प्रा. इ. आर. सावकार, प्रा.एम.एच पाटील, प्रा.एस.व्ही.कदम, प्रा.आर.एस. थिगळे, प्रा.नंदकिशोर बोदडे, प्रा.डॉ. संतोष जाधव, प्रा.सी.के.वसाने, सागर लोहार,मनोज बारी यांच्यसह महाविद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यात ६९४ च्या वर रिक्त जागे करीता जळगाव जिल्ह्यातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेड बाबा राजपूत, हिताची अष्टमी इंडिया हितेश नन्नवरे, जैन फार्म फ्रेश फड्स भीकेश जोशी, सुप्रीम इंडस्ट्रीज, क्रेडिट एक्सेस ग्रामीण राजू पाटील, स्टार फेब्रीकेटर्स कॅटर्स एम आय. डी. सी. जळगाव, सिग्मा फॅसिलिटी जळगाव सचिन पवार, एल.आय.सी.ऑफ इंडिया जळगाव जितेंद्र सैदाने, राईट सिस्टीम अँन्ड सॉफ्टवेअर जळगावचे मंदार व्ही शांडिल्य, आय.टी.एम.जळगाव अविनाश भडाने, समर स्टील इंडस्ट्रीज या कंपनीच्या प्रतिनिधींनी उपस्थित तरूणांच्या मुलाखती घेतल्या.

Protected Content