खामगावात ब्राम्हण सभेतर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या वतीने भाषीय सर्व प्रांतीय ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवारी ३ जुलै रोजी दुपारी ४ वाता स्थानिक महाराष्ट्र ब्राह्मण सभा कार्यालय रायगड कॉलनी येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. याप्रसंगी इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परिक्षेत तसेच एम.टी.एस./एन.टी.एस./गणित/विज्ञान ऑलीम्पीयाड या परीक्षेमध्ये पदक प्राप्त विद्यार्थी तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेमध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कौतुक सोहळ्यात प. पू. दिढे मामा यांची आशिर्वादपर उपस्थिती राहणार असून समाजातील गणमान्य मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका, फोटो व मोबाईल क्रमांक तसेच आपली नांवे ३० जून पर्यंत नोंदवून गौरव सोहळ्यास शहरातील सर्व भाषीय सर्व प्रांतीय ब्राह्मण समाज बांधवांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करावा असे आवाहन महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगांव चे वतीने करण्यात आले आहे.

Protected Content