जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील क्रिकेट स्पर्धेला रविवार, २७ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंत्र गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांच्या हातात बॅट बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणात जोरदार बॅटिंग करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानावर ही जोरदार बॅटिंग करत उपस्थितांचे लक्ष वेधले.

आपल्या अनोख्या शैलीतील भाषणामुळे राजकारणाचा आखाडा गाजवणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी उत्कृष्ट फलंदाजी करत क्रिकेटचही मैदान गाजवल्याच पहायला मिळालं. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे, गावातल्या टीमचा मी अनेक वर्ष कॅप्टन होतो. क्रिकेटची गुण राजकारणात कामी आले. असे सांगत मंत्री एकनाथ शिंदे आता आमचे कॅप्टन असल्याच मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.



