जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने ३० मे रोजी निघणाऱ्या ऐतिहासिक वाहन रॅलीसाठी डॉ. केतकीताई पाटील फाउंडेशन आणि गोदावरी फाउंडेशनने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. ३०० किलोमीटर अंतराची आणि ३०० चारचाकी वाहनांची ही भव्य रॅली समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे.
या रॅलीच्या नियोजनासाठी आज (मंगळवार, २७ मे २०२५) डॉ. केतकी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आणि भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. केतकीताई पाटील स्वतः उपस्थित होत्या. बैठकीत रॅलीचे तपशील, मार्ग, वाहन व्यवस्थापन, सहभागी प्रतिनिधींना सूचना आणि जनजागृती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केतकीताईंनी ‘केतकीताई मित्र परिवार’ आणि गोदावरी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना या ऐतिहासिक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले. रॅलीच्या यशासाठी प्रत्येक सदस्याने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
या भव्य रॅलीचे नेतृत्व राज्याचे लोकप्रिय नेते व मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात ही रॅली सामाजिक एकात्मता आणि ऐतिहासिक गौरव यांचा संगम ठरणार आहे. बैठकीस भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, भाजप महानगर सरचिटणीस तथा दुध संघांचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे मा. महामंत्री सुभाष सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे, डॉ. संजय पाटील, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, मल्हार सेनेचे मा. जिल्हाप्रमुख अरुण ठाकरे, धर्मराज सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, दिलीप नाझरकर, कुणाल सुलताने, दिलीप कवडे, संतोष कचरे, डिंगबर सोनवणे, प्रवीण पवार, सचिन धनगर हे उपस्थित होते. ही रॅली सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जागृतीचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.