Home क्रीडा पंजाबने पटकावले प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल विजेतेपद

पंजाबने पटकावले प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल विजेतेपद


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत पंजाब संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खेळाडूंना ‘खेळाडूवृत्ती जोपासणे गरजेचे’ असल्याचे सांगितले.

या स्पर्धेत देशभरातील नऊ राज्यांमधून १४४ खेळाडूंनी भाग घेतला होता. एकूण १९ सामने खेळले गेले आणि त्यात ७० गोल झाले. अंतिम सामन्यात संत बाबा हरिसिंग मॉडर्न स्कूल पंजाब आणि ग्रीनवूड हायस्कूल कर्नाटक यांच्यात अटीतटीचा सामना झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोलसाठी कसोशीने प्रयत्न केले, मात्र दुसऱ्या सत्रात पंजाबने दोन गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

यावेळी व्यासपीठावर सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, मुख्य पंच ललिता सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राची फातेमा दलाल हिला ‘बेस्ट गोलकीपर’ म्हणून सन्मानित करण्यात आले, तर पंजाबची जोया हसन स्पर्धेत सर्वाधिक १० गोल करत ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरली.


Protected Content

Play sound