एरंडोल अगारातील बसचालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल आगारातील बस चालकाने शहरातील मुख्य रस्त्यावरील रिक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याचा राग आल्याने दोघांनी बसचालकाला नोव्हेंबर २०१५ मध्ये मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने रिक्षाचालकासह एकाला एक वर्षाचा सक्तमजूरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

अनिल भाईदास भोपे व प्रविण यशवंत सावंत दोन्ही रा. कासोदा ता.एरंडोल अशी दोन्ही आरोपींची नावे आहे. अधिक माहिती अशी की, २३ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास एरंडोल बस आगारातील चालक  प्रविण सुरेश बडगुजर (एमएच २० ११९८) आगारात जात असतांना कासोदा ते एरंडोल रस्त्यावरील नगरपालिका बगीचा समोर आरोपी अनिल भाईदास भोपे व प्रविण यशवंत सावंत यांनी ॲपेरिक्षा (एमएच १६ एबी ५७६१) क्रमांकाची रिक्षा मध्यभागी लावली होती. ही रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेण्याचे  सांगितल्याचा राग आल्याने रिक्षाचालकासह एकाने बसचालकाला खाली ओढून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जिल्हा न्यायालयात दोघांविरूध्द दोषारोपण दाखल केले. न्यायमुर्ती एस.एस.माने यांनी एकुण सहा साक्षिदार तपासले. यात न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी २१ हजार रूपयांचा दंड व एक वर्षाची सक्त मजूरीची कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.  सदर कामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content