पुण्यात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस जळगावात अटक

Crime 21

जळगाव प्रतिनिधी । पुण्यापासूनजवळ असलेल्या हिंजेवाडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ काही तरुणांनी कार थांबवत धिंगाणा घालतांना दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा प्रकार 22 रोजी 9.30 वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणातील फरार आरोपी रामेश्वर शेषमल राठोड (वय-25) रा. आयटीआय कॉलनी, जामनेर याला एमआयडीसी पोलीसांनी गावठी कट्टा आणि काडतुसांसह अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आयटी नगरातील मारुंजी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या जळगाव जिल्ह्यातील सराईत टोळीला हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या शुभम मणिलाल जैन (वय-21), रा. गिरजा कॉलनी जामनेर, प्रकाश किशोर मोरे (वय-27) रा.गणेश वाडी जामनेर, विशाल अरुण वाघ (वय-22) रा. महुखेडा जामनेर आणि प्रतीक शिवाजी बारी (वय-20) रा.आयटीआय कॉलनी जामनेर यांना अटक करण्यात आली होती. यातील प्रशांत पाटील, रामेश्वर राठोड दोन्ही रा. जामनेर हे दोघे दुचाकीवरून फरार झाले होते. दरम्यान यातील एक आरोपी रामेश्वर राठोड हा जळगाव असल्याची माहिती पुणे पोलिसांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांची संपर्क साधून सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या लोकेशन नुसार त्याला बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अटक करून त्यांच्या ताब्यातील 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि 5 हजार रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतुसे हस्तगत केले.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजकुमार ससाणे, स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. विजय पाटील, पो.ना. मनोज सुरवाडे, अशोक सनगत, पोकॉ असिम तडवी, पो.कॉ. मुदस्सर काझी यांनी सापळा रचून संशयित आरोपी याला अटक केली.

Protected Content