अपघात विम्याच्या दाव्यासाठी पीयूसी बंधनकारक

नवी दिल्ली वृत्तसंस्था । वाहनांचा अपघात झाल्यास आता विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी अनिवार्य असणार आहे.

त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर २० ऑगस्टपासून विमा कंपन्यानी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करु नये, असे आदेश भारतीय विमा प्राधिकरणाने विमा कंपन्यांना दिले आहेत.

आयआरडीएने म्हटलं की, “सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे असणं गरजेचं आहे.

वाहनांचा विमा काढण्यासाठी यापुढे हे प्रमाणपत्र ग्राहकांना विमा कंपन्यांना द्यावं लागेलं. ” सुप्रीम कोर्टाने विमा कंपन्यांना आदेश दिले होते की, त्यांनी संबंधित वाहनाची पीयूसी तपासल्याशिवाय विम्याचे नुतनीकरण करु नये.

Protected Content