अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन घोड्यांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा- भडगाव दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने तीन घोड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

पाचोरा- भडगाव दरम्यानच्या रस्त्यावर ओम लक्ष्मी सिरॅमिकजवळ तीन लाल रंगाचे घोडे मृतावस्थेत आढळले. रात्रीच्या वेळी सदर घटना घडल्‍याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सकाळी नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला.

यात एक घोडा रस्ता दुभाजकाजवळ छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेला होता. तर दोन घोडे रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत पडले होते.

Protected Content