लाठीमारचा जाहीर निषेध : यावल येथे मराठा समाजाचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी तालुका अबंड येथे मागील पाच दिवसापासून मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलीसांनी लाठीमार व गोळीबार करून अनेक आंदोलनकर्ते यांना जखमी करण्यात आल्याच्या निषेधार्त शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

सहकारी खरेदी विक्री संघातुन सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यात समाजाच्या वतीने अतुल पाटील ,प्रा. मुकेश येवले , अजय पाटील ,उमाकांत पाटील ,देवीदास धांगो पाटील,अनिल साठे ,अॅड देवकांत पाटील, पवन पाटील , वसंत पाटील , विलास चंद्रभान पाटील , नानाजी प्रेमचंद पाटील ,डी सी पाटील , डॉ हेमंत येवले,डी बी पाटील , सुनिल गावडे ,महेश पाटील, समाधान पाटील, ललीत पाटील , गौरव भोईटे , स्वपनील चव्हाण, नरेन्द्र पाटील, यश पाटील , किरण पाटील , कोमल पाटील , शैलेश पवार , उदय पाटील , योगेश चव्हाण, विलास येवले , अमोल खैरनार , निळकंठ यादव , प्रकाश पवार, आशिष महाजन , कल्पेश पवार ,चंद्रकांत येवले, बापु जासुद, गुणवंत पवार , अनिल पवार , संजय पवार , कमलाकर पाटील , किरण महाजन यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी जिल्हा परिषदचे माजी गट नेते प्रभाकर सोनवणे यांनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दिला आहे.

Protected Content