Home क्राईम पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोघे ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोघे ताब्यात


 

 

पुणे: वृत्तसंस्था । पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

 

पूजा चव्हाण पुण्यात भाऊ विलास चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यासोबत राहत होती. पूजा चव्हाणचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला. त्यावेळी विलास आणि अरुण सदनिकेत होते. त्यांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पोलिसांनी या दोघांची व्यवस्थित चौकशी न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच आज पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन जण कोण आहेत, याची माहिती गुप्त ठेवली आहे.

 

आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत?, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे. तसेच ऑडिओ क्लिपमधील हे दोघे नसतील तर अरुण राठोड आणि विलास कुठे आहेत? असा सवालही केला जात आहे.


Protected Content

Play sound